अतिवृष्टीची मदत केव्हा मिळणार?
अकोला : यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबरअखेरपर्यंत पाऊस व पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पीक नुकसानभरपाईपोटी पहिल्या टप्प्यात शासनाकडून प्राप्त झालेली २६ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली; मात्र दुसऱ्या टप्प्यातील मदतनिधी अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे अतिवृष्टीची मदत केव्हा मिळणार, याबाबत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
गावागावांत निवडणुकीचे वारे !
अकोला : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या २२४ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या आनुषंगाने निवडणूक होत असलेल्या गावागावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत.
नियमांच्या पालनाकडे कानाडोळा !
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग इत्यादी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत असले तरी, शहरातील बाजार व अन्य ठिकणी या नियमांचे पालन करण्याकडे नागरिकांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.