अकोला: शहरातील वाहतूकीचे नियंत्रण करणारे पोलीस शुक्रवारी पुस्तक वाचनामध्ये रमुन गेले होते. निमित्त होते, माजी राष्ट्रपती, मिसाईलमॅन डॉ. ए.पि.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे. वाहतूक पोलिसांनी कलामचाचांचे पुस्तक वाचून त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला.बंदोबस्त, रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रण, गुन्ह्यांचा तपास या कामातूनच पोलिसांना वेळ मिळत नाही. परंतु मिसाईल मॅन डॉ. ए.पि.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी त्यांच्या अतुलनिय कार्याचे स्मरण व्हावे आणि त्यांना आदरांजली अर्पित करावी. या उद्देशाने वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कर्मचाºयांनी थोडा वेळ काढत, पुस्तक वाचनात घालविला. या उपक्रमाचे आयोजन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. प्रारंभी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पि.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचाºयांनी सकाळी ९ ते १0 या वेळेत कलामचाचांच्या जीवनकार्यावरील पुस्तकांसह कायदेविषयक, ज्ञान वृद्धीगंत करणाºया पुस्तकांचे वाचन करण्यात आले. शहर वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालयामध्ये पोलीस कर्मचाºयांसाठी १00 पुस्तके वाचनासाठी ठेवण्यात आली होती. वाहतूक नियंत्रणाच्या कामातून थोडा वेळ काढत, पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी वाचनात मन रमविले आणि कलामचाचांना आगळीवेगळी आदरांजली अर्पित केली.(प्रतिनिधी)