लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जीएसटी रिटर्न भरण्याची तारीख ३0 ऑक्टोबर आणि आयटी रिटर्न भरणाची तारीख ३१ ऑक्टोबर एक दिवसआड आल्याने व्यापारी-उद्योजक अक्षरश: वैतागले आहे त. सीए आणि करसल्लागारदेखील या तारखांमुळे त्रासले असून, आधी कोणता भरणा करावा याचा पेच त्यांना पडला आहे.वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) उद्योजक आणि मोठय़ा व्या पार्यांना आतापर्यंत दिलासा मिळालेला नाही तर दुसरीकडे त्यांना आयकर रिटर्न दाखल करण्याची भीती वाटत आहे. त्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर असून जीएसटी रिटर्न ३0 ऑक्टोबरपर्यंंत दाखल करायचे आहे. वार्षिक एक कोटी रुपयां पेक्षा जास्त उलाढाल असणार्या करदात्यांना दोन्हीपैकी पहिले कोणता रिटर्न भरायचे, या संदर्भात संभ्रमात टाकले आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भात वार्षिक एक कोटीपेक्षा जास्त उलाढाल करणारे २५ ते ३0 हजार करदाते आहेत. १ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर व्यापारी आणि उद्योजक यातील तरतुदी समजण्याचा प्रयत्न करीत आहेत. दर महिन्यात रिटर्न दाखल करण्याच्या नियमामुळे करदात्यांमध्ये संभ्रम आहे. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३0 सप्टेंबर होती. पण आयकर आणि जीएसटी रिटर्न भरण्यास असुविधा होत असल्यामुळे सरकारने आयकर रिटर्न भरण्याची तारीख एक महिना वाढविली होती.
१0 मापदंडाचे पालन करावे लागणार!चार्टर्ड अकाऊंटंटनुसार वर्ष २0१६-१७ च्या आयकर रिटर्नमध्ये ‘इन्कम कॉम्प्युटेशन अँण्ड डिस्क्लोजर स्टॅडर्डस’ (आयसीडीएस) के अंतर्गत १0 मापदंडाला ध्यानात ठेवून सर्व माहिती उपलब्ध करून द्यायची आहे. टॅक्स ऑडिट रिपोर्टची माहिती ४५ पॉईंटवर द्यावी लागते. मापदंडाच्या आधारावर गणना न केल्यास छाननीचा सामना करावा लागतो. या प्रक्रियेला वेळ लागत आहे आणि त्यामुळेच सीए प्रमाणित करण्यात कोणतीही घाई करीत नाहीत. अशा स्थितीत दोन्ही बाबतीत रिटर्न भरण्यास विलंब लागत आहे. ही बाब गांभीर्याने घेत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए नीलेश एस. विकमसी यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून ही बाब त्यांच्या ध्यानात देत कालावधी वाढविण्याचा आग्रह केला आहे. नागपुरातील सीए जेटली यांच्या उत्तराची वाट पाहत आहेत.
आयकर खाते बंद होण्याचा मॅसेज व्हायरल!जीएसटी कर प्रणाली मजबूत होत असल्याने पुढील वर्षांपासून आता प्राप्तिकर खाते गोठविले जाणार आहे. अशा स्वरूपाचा एक मॅसेज व्हॉट्स अँपवर व्हायरल झाला आहे. व्यापार्यांमध्ये या मॅसेजची जोरदार चर्चा आहे. याबाबत कर सल्लागार आणिजाचक अटी रद्दसाठी शिक्षक सेनेचे आंदोलन अधिकार्यांना विचारणा केली असता ही केवळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.
तर भरावा लागेल दंडनियमानुसार करदाता ठराविक वेळेत आयकर रिटर्न भरत नसेल तर त्यांना दंड भरावा लागणार आहे. दंडाची रक्कम जास्त राहील. व्यापारी वा उद्योजकाची वार्षिक उलाढाल एक कोटी रु पयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना अर्धा टक्क्यांपर्यंंत दंड अर्थात दंडाची रक्कम ५0 हजारांपर्यंंत असू शकते.