अकोला: उत्तर रेल्वे विभागाने कळविल्याप्रमाणे दिल्ली विभागातील तुघलकाबाद ते पळवल रेल्वे स्थानकादरम्यान असणाºया बल्लभगड रेल्वे स्थानकावर चौथ्या रेल्वे लाइनचे काम हाती घेण्यात आल्यामुळे नांदेड येथून अमृतसर आणि श्रीगंगानगरकडे जाणाºया काही रेल्वेगाड्या रद्द तर काहीचे मार्ग वळविण्यात आले आहे.सोबतच तिसरी लाइन बंद करण्यात येणार असल्यामुळे नॉन इंटर लॉक वर्किंगचे कार्य हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या स्थानकावर थांबणाºया बºयाच गाड्या येथे थांबणार नाहीत. या रेल्वेस्थानकाऐवजी ४ किलोमीटर पुढे असणाºया फरिदाबाद न्यू जंक्शन रेल्वेस्थानकावर थांबविण्यात येणार आहेत.या नॉन इंटर लॉक वर्किंगच्या कालावधीत नांदेड रेल्वे विभागातून निघणाºया रेल्वे गाड्यांवर पुढीलप्रमाणे परिणाम होणार आहे. पूर्णत: रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये १२४२१ क्रमांकाच्या नांदेड ते अमृतसर, ४ सप्टेंबरपर्यंत पूर्णत: रद्द करण्यात आली आहे. १२४८६ क्रमांकाची श्री गंगानगर ते नांदेड ३ सप्टेंबरपर्यंत रद्द केली आहे. १२४८५ क्रमांकांची नांदेड ते श्री गंगानगर २ रेल्वेगाडी ५ सप्टेंबरपर्यंत रद्द आहे. २२४५८ क्रमांकाची अम्ब अन्दौरा ते नांदेड रेल्वेगाडी ५ सप्टेंबरपर्यंत रद्द केली आहे. २२४५७ क्रमांकाची नांदेड ते अम्ब अन्दौरा सप्टेंबरपर्यंत रद्द आहे. मार्ग बदलण्यात आलेल्या गाड्यांमध्ये अनेक गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.