————-
वृक्षमित्र परिवाराकडून ‘झाडे जगवा’ मोहीम
अकोट : तालुक्यातील पुंडा येथे वृक्षमित्र परिवार स्वखर्चाने मागील दोन वर्षांपासून वृक्षलागवड करून संगोपन करीत आहे. मागील दोन वर्षांत सुमारे १००० झाडांचे वृक्षारोपण करून झाडांचे संगोपन करीत वृक्षमित्र परिवाराने आदर्श निर्माण केला आहे.
——————
वाडेगाव येथे कोविड लसीकरणाला प्रतिसाद
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेत नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आठवड्यातून तीन दिवस कोविड लसीकरण करण्यात येते.
————
‘रोहयो’ अंतर्गत कामे उपलब्ध करण्याची मागणी
बार्शीटाकळी: तालुक्यातील प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून शेतकरी, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रब्बी हंगाम संपत आल्याने नागरिकांच्या हाताला काम नसल्याचे चित्र आहे. तालुक्यात मजुरांच्या हाताला काम नाही. मजूर कामाच्या शोधात महानगरात जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रोजगार हमी योजने अंतर्गत कामे उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.