अकोला : मध्य रेल्वेच्या कसारा- टिटवाळा दरम्यान ओएचडी (ओव्हर हेड ईलेक्ट्रीक) टावर वॅगन घसरून झालेल्या अपघातामुळे ५०ते ६० मीटर रेल्वे ट्रक लाईन खराब झाली. यामुळे नागपूरहून मुंबईकडे धावणाºया ७ गाड्या कसारा घाटात रोखण्यात आल्या. गुरूवारी सायंकाळी धावलेल्या रेल्वेगाड्या कसारा घाटात रोखल्या गेल्याने हजारो प्रवाशी अडकले आहेत.गुरूवारच्या उत्तररात्री घडलेल्या या अपघातामुळे रेल्वे प्रशासनाने अपकडून धावणाºया सर्व रेल्वे गाड्या कसारा घाटात थांबविल्या आहे. डाऊन साईडच्या गाड्या मात्र सोडल्या जात आहे. कसारा घाटात थांबलेल्या घाटामध्ये कुर्ला, शालीग्राम,हावडा मेल, ज्ञानेश्वरी, अमरावती , विदर्भ, सेवाग्राम रेल्वेगाड्या रोखल्या गेल्या आहे. त्यामुळे उपरोक्त गाडीत बसून मुंबईकडे प्रवास करण्यासाठी निघालेले सर्व प्रवासी मध्येच अडकले आहे. सकाळपासून युध्दस्तरावर रूळबदलण्याचे कार्य सुरू असले तरी दुपारी दोन वाजेपर्यत दुरूस्ती झालेली नव्हती. अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली आहे.
नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या कसारा घाटात अडकल्या; प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 3:16 PM