राम देशपांडे /अकोला : अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचणार्या बहुतांश गाड्या ह्यलाइन क्लिअरह्ण नसल्याने अप आणि डाऊन बाजूकडील आऊटिंगवर थांबविल्या जातात. सिग्नल न मिळाल्याने बराच वेळ थांबून राहणार्या गाड्यांच्या वेळापत्रकात निर्माण होणारी तफावत, प्रवाशांचा नाहक वाया जाणारा वेळ आणि आऊटिंगवर रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात, अशा अनेक बाबींवर नियंत्रण मिळविण्याकरिता मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक १ वर नव्याने तयार करण्यात आलेल्या इमारतीत संगणकीकृत ह्यमार्ग नियंत्रण प्रणालीह्ण बसविण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पूर्वीच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या अकोला मार्गे धावणार्या रेल्वे गाड्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. अकोला-पूर्णा मीटरगेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये झाल्यानंतर या मार्गावर धावणार्या गाड्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. अप किंवा डाऊनकडून येणार्या गाड्यांना स्थानकाच्या फलाटाजवळील मार्गावर येईस्तोवर अनेक रेल्वे क्रॉसिंग पार करावे लागतात. सध्याच्या घटकेला रेल्वे स्थानकात प्रवेश करणार्या गाडीला सिग्नल देण्यापूर्वी तिच्या मार्गातील सर्व क्रॉसिंग केबीनमॅन स्वत: बंद करतो. बिर्लागेट व देशमुख फैल भागात रेल्वेमार्गालगत असलेल्या नियंत्रण कक्षात या कामासाठी २४ तास रेल्वे कर्मचारी तैनात असतात. स्वयंचलित यंत्रणा नसल्याने बहुतांश गाड्या आऊटिंगवर अर्धा-अर्धा तास थांबून राहतात. यामुळे बिघडणारे रेल्वेचे वेळापत्रक व प्रवाशांचा वाया जाणारा वेळ, तसेच आऊटिंगवर रेल्वे क्रॉसिंग ओलांडताना घडणारे अपघात, अशा अनेक समस्यांवर नियंत्रण मिळविण्याकरिता अकोला रेल्वे स्थानकावर स्वयंचलित मार्ग नियंत्रण प्रणाली कार्यान्वित होणार आहे. याकरिता फलाट क्रमांक १ वरील पाण्याच्या टाकीजवळ नियंत्रण कक्षाकरिता विशेष इमारत तयार करण्यात आली असून, त्यात संगणकीकृत मार्ग नियंत्रण प्रणाली बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
नाही थांबणार गाड्या ‘आऊटिंग’वर!
By admin | Published: July 24, 2015 11:44 PM