जिल्ह्यातून मध्य प्रदेश, तेलंगाणा राज्यात एसटी महामंडळाकडून बस फेऱ्या सोडण्यात येतात. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे शेजारील राज्यांनी कोरोनाचा वाढता धोका पाहता, राज्यातून बस फेऱ्यांना प्रतिबंध केला. दरम्यान, मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्याही घटली. आता काही प्रमाणात राज्यातील निर्बंध हटले असतानाही मध्य प्रदेशातील बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या नाहीत. मध्य प्रदेश सरकारने ३० जूनपर्यंत या बस सेवांवर प्रतिबंध घातला होता. त्यामुळे यापुढेही प्रतिबंध कायम राहतात की नाही, याबाबत स्पष्ट झालेले नाही; परंतु तेलंगाणातील हैदराबाद, आदिलाबाद, निजामाबादसाठी बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत; मात्र या फेऱ्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. राज्यात पुन्हा निर्बंध लावल्याने प्रवासी घरातच बसून आहे.
पुन्हा तोटा वाढला!
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहे. २८ जूनपासून ४ पर्यंतच बाजारपेठ सुरू ठेवण्यात येत आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. निर्बंधांमुळे प्रवासी संख्या घटली आहे. शहरातील आगार क्रमांक २ चे उत्पन्न निम्म्यापेक्षा कमी झाले आहे.
जिल्ह्यातील एकूण आगार
७
आगारातील एकूण बसेस
५२
सध्या सुरू असलेल्या बसेस
३२
रोज एकूण फेऱ्या
८०-९०
दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बसेस
२
दुसऱ्या राज्यातील प्रवासी मिळेनात!
मागील काही दिवसांपासून निर्बंध हटले असतानाही मध्य प्रदेशातील बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या नाहीत.
तेलंगाणातील हैदराबाद, आदिलाबाद, निजामाबादसाठी बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत; मात्र या फेऱ्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही.
कोरोनाची भीती अजूनही संपली नाही. निर्बंध काही प्रमाणात हटल्यास प्रवासी संख्या वाढण्याचा अंदाज आहे.
अमरावती, औरंगाबाद मार्गावर प्रवाशांची गर्दी
अनलाॅकमध्ये बससेवा पूर्ववत सुरू झाली; परंतु राज्य शासनाने पुन्हा निर्बंध लावल्याने प्रवासी संख्या रोडावली आहे.
इतर जिल्ह्यात जाणाऱ्या फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. यामध्ये अमरावती, औरंगाबाद येथील फेऱ्यांना काही प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
शिवशाही बसेसना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मुंबई, पुणे बसेसनादेखील प्रतिसाद कमी प्रमाणात आहे.