अकोला: शुक्रवारपासून सुरू झालेले वाहतूकदारांचे राष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलन शनिवारच्या दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. आंदोलनास मिळत असलेल्या संमिश्र प्रतिसादामुळे शनिवारी अकोला ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी वाहने थांबविण्यासाठी रस्त्यावर उतरले. अकोला-वाशिम बायपास मार्गावर उतरून या पदाधिकाºयांनी वाहन चालकांना चक्का जाम आंदोलनात सहभागी करून घेतले.डीझल दरवाढ, टोल आकारणी आणि थर्ड पार्टी विम्यातील अपारदर्शकता, टीडीएस आकारणी आदी प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील वाहतूक व्यावसायिकांनी शुक्रवार, २० जुलैच्या सकाळी ६ वाजतापासून चक्का जाम सुरू केला आहे. पहिल्याच दिवशी अकोल्यातील विविध मार्गावर दोन हजार वाहने अडकून होती. आंदोलनाच्या दुसºया दिवशी अनेक मार्गावर वाहतूक सुरू असल्याची माहिती ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाºयांना मिळाली. त्यामुळे सर्व पदाधिकाºयांनी चौकाचौकात जाऊन वाहने अडविली. आंदोलनाचा परिणाम तीन दिवसानंतर सर्वसामान्य जनतेला जाणवणार असल्याचे बोलले जात आहे. वाहने थांबविण्यात अकोला ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मजहर अली, सचिव जावेद खान, बाबासेठ आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.