लोणार : अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई केल्यामुळे गत पाच दिवसांपासून तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी वर्गात वाढ झाली आहे; मात्र ग्रामीण भागातून ये-जा करण्यासाठी पुरेशा बसेस नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना बसच्या टपावर बसून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट होऊन एसटी तोट्यात आल्याचा आरोप राज्य परिवहन मंडळाच्या काही आगाराकडून होत आहे. तसेच अवैध प्रवासी वाहतुकीला पोलिस प्रशासनाचे आशीर्वाद असल्याचे आरोपही सातत्याने होतात. उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शर्मा यांनी कर्तव्यदक्षपणा दाखवत रुजू झाल्यापासूनच अवैध धंदे व अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यास सुरुवात केली. नियमानुसार प्रवासी वाहतूक करण्याची तंबीच वाहनधारकांना देण्यात आली. त्यामुळे ही अवैध वाहतूक बंद केली आहे.ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांकरिता पुरेशा बसेस मेहकर आगाराकडून सोडण्यात येत नाही. त्यामुळे प्रवाशांचे व शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत असून, बसच्या टपावर बसून जीवघेणा प्रवास ग्रामीण भागातील प्रवासी करीत आहेत. अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई करूनही पोलिस प्रशासन सामान्य जनतेच्या टीकेचे लक्ष्य बनत आहे. यामुळे पोलिस विभागाची अवस्था ह्यअडकित्त्यात सुपारीह्ण अशी झाली आहे.
बसच्या टपावर बसून प्रवास
By admin | Published: September 22, 2014 11:58 PM