याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्यासह विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता कृषी डॉ. महिंद्र नागदेवे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे, सहयोगी अधिष्ठाता वनविद्या डॉ. यायचे तायडे, सहयोगी अधिष्ठाता पदव्युत्तर शिक्षण संस्था डॉ. धनराज उंदीरवाडे, सहयोगी अधिष्ठाता निम्न कृषी शिक्षण डॉ. बी. व्ही सावजी, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, विद्यार्थी कल्याण अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. या निमित्ताने संपूर्ण विद्यापीठ परिसरात वृक्षलागवडीचे महत्त्वाकांक्षी उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. वृक्ष लागवडीसह वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधिक असल्याचे सांगत आज लागलेले प्रत्येक झाड येणाऱ्या वर्षात फलदायी ठरले पाहिजेत, असा आशावाद कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृषी विद्यापीठात वृक्ष लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:14 AM