अकोला: जिल्ह्यामध्ये वंसतराव नाईक हरित महाराष्ट्र योजनेअंतर्गंत भारत वृक्ष क्रांती मिशन यांच्या सहयोगाने ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ हा वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शनिवार रोजी ‘एक विद्यार्थी, एक वृक्ष’ उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांच्या हस्ते आगरकर विद्यालय येथे होणार आहे. या अभियानात वृक्ष लागवडीसाठी नियोजन करण्यात आले असल्याची माहिती भारत वृक्ष क्रांती मिशनचे षण्मुगन ए.एस. नाथन यांनी दिली, त्यानुसार या अभियानात वृक्ष लागवडीसाठी विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची आवश्यक नाही. त्यांना झाडांची रोपे शिक्षण विभागामार्फत व ग्रामीण भागात ग्राम पंचायतीच्या सहयोगाने पोहचविली जाईल. विद्यार्थी आपआपल्या घरी किंवा शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करुन या उपक्रमात सहभागी होवू शकतील. याच अभियानाअंतर्गत मागील वर्षी 1 लाख 80 हजार वृक्ष लागवड करण्यात आली होती. यावर्षी माध्यमिक शिक्षण विभागातर्फे 1 लाख 21 हजार 800 तर प्राथमिक शिक्षण विभागातर्फे 1 लाख 49 हजार 679 वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती भारत वृक्ष क्रांती मिशनचे संस्थापक षण्मुगन ए.एस. नाथन यांनी दिली.
‘एक विद्यार्थी, एक वृक्ष’अंतर्गत वृक्ष लागवड शुभारंभ 15 ऑगस्ट पासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 7:08 PM