शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

अकोट तालुक्यात आदिवासी शेतकरी दाम्पत्याने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:05 PM

Farmer Suicide : दुबार पेरणी व कर्जबाजारीपणाचे कारण.

- विजय शिंदेअकोटःअकोट तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या शहापूर रुपागड या गावात आदिवासी समाजाचे पती-पत्नीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना १८ जुलै रोजी दुपारी घडली. या पती-पत्नीने शेतात दुबारपेरणी केली शिवाय कर्जाचे आर्थिक विवंचनेत सापडल्याने आत्महत्या करण्यामागील प्राथमिक कारण असल्याची माहीती आहे.हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शहापूर - रुपागड येथील मृतक पती सुरज तूकाराम भारसाकळे (वय ३५) व  पत्नी कविता सुरज भारसाकळे (३०)  यांच्या कडे अडीच एकर शेती आहे. या वर्षी त्यांनी शेतात निसर्गाच्या लहरीपणामुळे दुबार पेरणी केली. शिवाय कर्जाचा डोगंर वाढल्याने त्यांची परिस्थिती हलाखीची झाली होती. सतत आर्थिक विवंचनेत सापडल्याने मानसिक खालावलेला स्थितीत दोघांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. सदर घटना उघडकीस येताच त्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. पंरतु प्रकृती ढासळत असल्याने त्यांना अकोला रेफर करण्यात आले. पंरतु काळाने अकोला पोहचण्यापुर्वी झडप घातल्याने दोघांचा दुदैवी मृत्यु झाला. त्यांचे मागे असलेले लहान चिमुकले एक मुलगा व दोन मुली पोरके झाले आहेत.. मृतकचे सुरजच्या आईवडील,भाऊ  यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. कोरोना लाँकडाऊनच्या काळात आर्थिक विवंचनेत असलेल्या या कुटुंबाने कपाशी व तुर पिकाची दुबार पेरणी केली. जुने कर्ज भरुन नवीन कर्ज उचलले होते. सतत आर्थिक परिस्थितीने हतबल झाल्याचे रुग्णालयात त्यांचे सोबत असलेले पोपटखेड येथीलनातेवाईक पांडुरंग तायडे यांनी सांगितले. चौकट....अकोट येथे उपजिल्हा रुग्णालय मंजुर केल्याचा गवगवा आमदार प्रकाश भारसाकळे हे दोन वर्षापासून करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय दर्जाचे कोणतेही उपचार होत नाहीत. त्यामुळे अनेक गंभीर रुग्णांना अकोला उपचारासाठी रेफर केले जाते. या रेफर मध्ये आज पुन्हा एका आदिवासी समाजाचे पती-पत्नीला वेळेवर  उपचार न मिळाल्याने जिव गमवावा लागला.अकोट तालुक्याला सातपुडा जंगल परिसरातील  आदिवासीबहुल गावे जोडली आहेत. सतत गंभीर घटना घडत असल्याने अकोट-अकोला रस्त्याची दुर्दशा व उपचाराअभावी अनेकांचे जीव गेले आहेत.

टॅग्स :akotअकोटfarmer suicideशेतकरी आत्महत्या