लोकमत न्यूज नेटवर्कपोपटखेड: प्रसूतीनंतर आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पोपटखेड येथून जवळच असलेल्या मलकापूर (गोंड) येथे २९ जुलै रोजी सकाळी १० वाजता घडली. आरोग्याविषयी जनजागृती नसल्याने या महिलेचे बाळंतपण घरीच करण्याचा अट्टहास तिच्या कुटुंबीयांना नडला. जुळ््या मुलींच्या जन्मानंतर या महिलेचा मृत्यू झाला.मलकापूर येथील रामेश्वर दहीकर यांची मुलगी बाली हिचा विवाह धारणी तालुक्यातील सुसरदा येथे रामेशवर बेठेकर यांच्याबरोबर झाला. एक महिन्यापूर्वी ही मुलगी प्रसूतीसाठी मलकापूर येथे आली होती. पोपटखेड येथील प्राथमिक उपकेंद्रातील कर्मचारी व आशा स्वयंसेविकांनी या महिलेची काळजी घेणे सुरू केले होते.२९ जुलै रोजी या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर तिला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र किंवा अकोट येथे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी व गावातील नागरिकांनी दिला; मात्र तिच्या कुटुंबीयांनी घरीच प्रसूती करण्याचा हट्ट धरला. दोन जुळ््या मुलींना जन्म दिल्यानंतर या महिलेचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात विशेषत: आदिवासी भागात अजूनही रुग्णालयात प्रसूती करण्याविषयी जनजागृती झाली नसल्याचे या घटनेवरून दिसते. तसेच आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.ही महिला एक महिन्यापूर्वी मलकापूर येथे आली होती. तेव्हापासून तिची काळजी घेणे सुरू केले होते. आम्ही गावामध्ये शिबिर घेतले होते. त्यामध्येही महिलेला तपासणी करण्यासाठी बोलावले होते; मात्र महिला तपासणीसाठी आलीच नाही. महिलेची प्रसूती अकोट येथे करा, असा सल्ला दिला; परंतु त्यांनी घरीच प्रसूती केली.- आशिष अकरते, वैद्यकीय अधिकारी, पोपटखेडमाझी पत्नी बाली हिची ही दुसरी प्रसूती होती. यापूर्वी आम्हाला दोन वर्षांची मुलगी आहे. तिची सुसरदा येथे आरोग्य तपासणी केली होती; मात्र प्रसूती होईपर्यंत आम्हाला जुळ््या मुली असल्याचे समजलेच नव्हते.-रामेश्वर बेठेकर, महिलेचा पती
आदिवासी महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 2:39 AM
पोपटखेड: प्रसूतीनंतर आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पोपटखेड येथून जवळच असलेल्या मलकापूर (गोंड) येथे २९ जुलै रोजी सकाळी १० वाजता घडली.
ठळक मुद्देआदिवासी भागात जनजागृतीचा अभाव