माेकाट कुत्र्यांचा हैदाेस
अकाेला : शहरात सध्या माेकाट कुत्रे व डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत; मात्र कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघातांचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. अनेक ठिकाणी रात्री कुत्री दुचाकीच्या मागे लागत असल्याने वाहनधारक
त्रस्त झाले आहेत.
बेदी यांच्या लाइव्ह कार्यक्रमात केले अभिवाचन
अकाेला : पाँडेचरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर डॉ. किरण बेदी यांच्याद्वारे फेसबुकवर लाइव्ह व्हर्च्युअल बुक रिडिंग सेशन दर शुक्रवारी घेण्यात येते. या कार्यक्रमामध्ये प्रभातच्या बतुल अलमदार या विद्यार्थिनीने अभिवाचन करून कृतीशिल सहभाग घेतला. बेदी यांच्या ''मेकिंग ऑफ टॉप कॉप'' या पुस्तकांचे अभिवाचन करण्यासाठी विद्यार्थी सहभागी झाले हाेते .
पथदिव्यांअभावी रस्त्यावर अंधार
अकाेला : सहकार नगर चाैक ते तुकाराम चाैकापर्यंत पथदिवे बंद असल्याने या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले दिसते. या
मार्गावर वीज तारा टाकून खांब टाकण्यात आले आहेत; मात्र या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाही. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी आहे.
‘मुख्यालयी राहणे सक्तीचे करा!’
अकाेला : अकाेला तालुक्यासह बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी तालुक्याच्या ग्रामीण भागात कार्यरत कर्मचारी दररोज अप-डाउन करत आहेत. हे कर्मचारी मुख्यालयी राहातच नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहात नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडत आहेत.
कचऱ्याचे विलगीकरण नाहीच!
अकाेला : शहरासह तालुक्यात नगरपालिकेच्यावतीने कचरा संकलीत केला जाताे; मात्र कचऱ्याचे विलगीकरण केले जात आहे. कचऱ्याचे व्यवस्थापनाचे कामसुद्धा रखडलेले आहे. त्यामुळे कचरा विलगीकरणाचा उद्देश सफल हाेत नाही, तसेच या घंटा गाड्यांचीही स्वच्छता हाेत नसल्याने दुर्गंधित भर पडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
भाजपची हवा निघाली!
अकाेला : विधान परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. या निकालांमध्ये भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळाला. या निकलामधून महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची हवा काढण्याचे काम केले आहे, असा टाेला प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ता कपील ढाेके यांनी पत्रकाद्वारे हाणला आहे.