अकोला : दीनबंधू फोरम, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असो.(डाटा) यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यीक डॉ. गंगाधर पानतावणे यांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन २९ मार्च रोजी सुधाकरराव नाईक महाविद्यालय, अकोला येथील सभागृहात करण्यात आले होते. आदरांजली सभेचे अध्यक्ष जेष्ठ आंबेडकरी समीक्षक डाँ. चिंतामण कांबळे, मूर्तिजापूर, हे होते. तर प्रभारी प्राचार्य डॉ.जयंत बोबडे, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी, कवी, विजय दळवी, आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. एम. आर. इंगळे, जेष्ठ साहित्यिक आ. कि. सोनोने, सुप्रसिद्घ लेखक, सुरेश साबळे डॉ. गजानन मालोकार, प्रा. मोहन खडसे, प्रा. प्रदीप चोरे, प्रा. डॉ. गोपाल उपाध्ये, डॉ. भास्कर पाटील, यांची प्रमुख उपस्थिती याप्रसंगी होती.प्रारंभी डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून सामूहिक आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. जयंत बोबडे यांनी डॉ. पानतावणे यांचे पदस्पर्श सुधाकरराव नाईक महाविद्यालयास लाभून येथेच त्यांचे व्याख्यान ऐकण्याची संधी आम्हाला लाभली असे सांगून त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा परिचय दिला. यावेळी मंचावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. लेखक प्रा. शेखर कोरडे, अॅड. श्रीकृष्ण टोपरे, डॉ. बी. एच. किर्दक, डॉ. दिवाकर कृष्ण आचार्य, राजेंद्र पातोडे, प्रा. प्रदीप चोरे, डॉ. वर्षा सुखदेवे, डॉ. विलास तायडे,कवी विनोद बोरे, कांबळे, विशाल नंदागवळी आदी मान्यवरांनी शोकभावना प्रकट केल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. भास्कर पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ.अशोक इंगळे यांनी केले तर सर्व मान्यवर उपस्थितांचे आभार डॉ. विनोद इंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. जयंत बोबडे, प्रा. कैलाश वानखडे, प्रा. दिवाकर सदांशिव, डॉ. संदीप भोवते, डॉ.अनिल दडमल, प्रा. राहुल माहुरे, प्रा. शेखर कोरडे, माणिक आगळे ,सुधाकरराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला डॉ. विजय शेगावकर, निळूभाऊ इंगळे, बी. गोपनारायण, प्रा. विजय आठवले, प्रा. रवी मोहोड, राहुल इंगळे, डॉ. रवींद्र सदांशीव, प्रा. शाम गवई, संजय कोकाटे, डॉ.विनोद खैरे, कवी प्रकाश बागडे विविध सामाजिक व साहित्यिक संघटनांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.