बळीराम वानखडे /खामगावविधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून येत्या १५ ऑक्टोबर २0१४ रोजी मतदान होणार आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत असताना एक माजी आमदार रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याने आता चौरंगी लढतीचे चित्र पुढे येत आहे. १२ स प्टेंबर २0१४ रोजी एका बैठकीत कार्यकर्त्यांसोबत चर्चेनंतर सदर निर्णय झाला आहे.खामगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या १५ वर्षांपासून आमदार दिलीपकुमार सानंदा आमदार आहेत. गेल्या ४0 वर्षांपासून खामगावात राजकीय पटलावर आमदार भाऊसाहेब फुंडकरांनी आपली राजकीय चुनूक दाखवत खामगावातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आपला ठसा उमटविला. परंतु गेल्या १५ वर्षांंपासून खामगाव मतदार संघात त्यांना आमदार दिलीप सानंदांनी काठावर लागू दिले नाही. त्यांचे सर्व फासे उलटे पडले. आता विधानसभेसाठी कोण लढणार, भाऊसाहेब की त्यांचा मुलगा, हे लवकरच कळेल. अशा प्रकारे तिरंगी लढतीचे चित्र तयार होत असतानाच, भाऊसाहेब फुंडकर यांच्या मदतीने दोन वेळा निवडून आलेल्या, एका माजी आमदाराने निवडणूक लढविण्याची तयारी चालविल्याने राजकीय व तरुळात चर्चेला उधान आले आहे. हा माजी आमदार, सानंदा निवडून आल्यानंतर काहीच करू शकला नाही, हे विशेष. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची युती होणार नाही व आपल्यालाच राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळणार असा विश्वास या माजी आमदारास आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली, तरीही अपक्ष निवडणूक लढविण्याची ते करीत असल्याची माहिती त्यांच्या निकटस्थ सुत्रांनी दिली. अशा परिस्थितीत खामगाव विधानसभा मतदारसंघात तिरंगी नव्हे, चौरंगी लढतीचे चित्र समोर आले आहे.
तिरंगी नव्हे तर चौरंगी लढत
By admin | Published: September 15, 2014 12:54 AM