शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

‘बॉटल नेक’चा तिढा शासन दरबारी

By admin | Published: July 06, 2017 12:54 AM

रस्त्याची सीमारेषा स्पष्ट करा; मनपाचे नगररचना संचालकांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला आडकाठी ठरणाऱ्या इन्कम टॅक्स चौकातील ‘बॉटल नेक’चा (निमुळता भाग) तिढा शासन दरबारी पोहोचला आहे. रस्त्याची रुंदी २४ मीटर असताना एकाच बाजूच्या मालमत्तांना निष्कासित केल्या जाणार असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. यासंदर्भात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत दहा दिवसांपूर्वी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत गोरक्षण रोडची सीमारेषा स्पष्ट करण्याची मागणी मनपा प्रशासनाने थेट नगररचना विभागाच्या सहायक संचालकांकडे लावून धरली आहे. यासंदर्भात नगररचना संचालकांना पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता स्थानिक खासदार, पालकमंत्री तसेच आमदारांनी सर्वप्रथम रस्ते दुरुस्तीच्या कामाला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्ते विकासाची कामे शहराच्या भविष्याचा विचार करून अमलात आणावीत, अशी अकोलेकरांची रास्त अपेक्षा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला सुरुवात झाली असून, नेहरू पार्क ते संत तुकाराम चौकापर्यंत एकूण २ हजार ६३१ मीटर अंतर व १५ मीटर रुंदीचा रस्ता तयार होईल. त्याच्या मधात दीड फूट रुंदीचे दुभाजक व एलईडी पथदिवे लागतील. पहिल्या टप्प्यात नेहरू पार्क चौक ते गोरक्षण संस्थानपर्यंत १ हजार ३२० मीटर अंतराच्या रस्ते दुरुस्तीला सुरुवात झाली; मात्र पहिल्याच टप्प्यात महापारेषण कार्यालय ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंत ५०० मीटर अंतराच्या इन्कम टॅक्स चौकातील इमारतींमुळे रस्ता रुंदीकरणाला आडकाठी निर्माण झाली आहे. स्थानिक रहिवासी, व्यावसायिकांच्या इमारतींमुळे चक्क ५०० मीटर अंतरापर्यंत ‘बॉटल नेक’(निमुळता भाग) तयार होईल. गोरक्षण रस्त्याची रुंदी २४ मीटर असताना एकाच बाजूच्या इमारती निष्कासित होणार असल्याचा मुद्दा स्थानिक मालमत्ताधारकांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे उपस्थित केला. यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत मनपा आयुक्त अजय लहाने तसेच सहायक संचालक नगररचना विभाग, पुणे यांची बैठक पार पडली. गोरक्षण रोड रस्त्याची रुंदी इन्कम टॅक्स चौकात कशी कमी होते, त्याची सीमारेषा निश्चित करून दिल्यास ‘बॉटल नेक’चा विषय निकाली काढणे शक्य असल्याची भूमिका मनपा प्रशासनाने मांडली, तसेच यासंदर्भात सहायक संचालक, नगररचना विभाग, पुणे यांना पत्र दिल्याची माहिती आहे. ‘डीपी’ प्लाननुसार २४ मीटरचा रस्ताशहर विकास आराखड्यानुसार (डीपी प्लान) गोरक्षण रोडची रुंदी २४ मीटर म्हणजेच ८० फूट अधिक आहे. मनपाच्या नकाशावर ही रुंदी नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम चौकापर्यंत एकसमान दाखविण्यात आली असताना इन्कम टॅक्स चौकात रस्त्याची रुंदी १५ मीटर कशी होते, असा सवाल उपस्थित होतो. याविषयी नगररचना विभागाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मनपाने लावून धरली आहे. जमीन घेण्याचे मनपाला अधिकारविकास कामांच्या आड येणारी खासगी जमीन, जागा ताब्यात घेण्याचे महापालिकेला अधिकार आहेत. गोरक्षण रोडवरील रहिवासी व व्यावसायिकांनी उभारलेले अनधिकृत बांधकाम मनपाने जमीनदोस्त केल्यास त्यासंदर्भात कोणताही दावा न्यायालयात टिकाव धरणार नाही. अशा स्थितीत संबंधित मालमत्ताधारकांनी शहर विकासाला हातभार लावण्याची गरज असल्याचा सूर उमटत आहे.