अकोला: शहरातून मूर्तिजापूरकडे जात असलेल्या एका दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास शासकीय दूध डेअरीसमोर घडली. या अपघातात दुचाकीवरील महिला जागेवरच ठार झाली. ती कारंजा येथे मुलगी व ना तवाला भेटण्यासाठी जात होती.डाबकी रोडवरील रेणुकानगर येथील रहिवासी सुरेश धोत्रे (५९) व त्यांच्या पत्नी सविता धोत्रे (५१) हे दोघे एमएच ३१ जी ९११२ क्रमांकाच्या दुचाकीने वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे मुलगी व नातवाला भेटण्यासाठी रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घरून निघाले. राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय दूध डेअरीसमोरून ते जात असताना ग ितरोधकावर दुचाकीची गती कमी झाली. यावेळी पाठीमागे असलेल्या ट्रकने दुचाकीला धक्का दिला. त्यामुळे सविता धोत्रे या दुचाकीवरून पडल्या व ट्रक अंगावरून गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. पहाटे-पहाटे घडलेल्या या घटनेच्या वेळी घटनास्थळावर कुणीही उपस्थित नसल्याने चालक ट्रक घेऊन फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच खदानचे ठाणेदार छगनराव इंगळे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले; मात्र अपघात सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सिव्हिल लाइन्स पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयामध्ये पाठविला. याप्रकरणी सुरेश श्रीराम धोत्रे यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध भादंविच्या कलम ३0४ (अ), ३३८, २७९ व मोटर वाहन अधिनियमाच्या कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल केला. ट्रकचालकाचा शोध सुरू करण्यात आला आहे.
ट्रकने दुचाकीस चिरडले, महिला ठार
By admin | Published: February 22, 2016 2:23 AM