शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

वाळूमाफियांकडून पोलीस अधिका-यास चिरडण्याचा प्रयत्न!

By admin | Published: September 02, 2016 1:17 AM

पाठलाग करून पडकला वाळूचा ट्रक; कारंजा महसूल व पोलीस प्रशासनाची कारवाई.

कारंजा लाड (जि. वाशिम), दि. १ : बेकायदा पद्धतीने वाळू घेऊन जाणार्‍या ट्रकचालकाने पोलिसांनी नाकाबंदीसाठी लावलेल्या ह्यबॅरिकेड्सह्णला धडक मारून सहायक पोलीस उपनिरीक्षकास चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने त्यात ते बचावले. यादरम्यान, ३५ किलोमीटर अंतरापयर्ंत सिनेस्टाइल पाठलाग करून पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी मंगरूळपीर तालुक्यातील पोटी फाट्याजवळ ट्रकचालकास जेरबंद केले.येथील उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. शरद जावळे हे गुरुवार, १ सप्टेंबर रोजी दुपारी १.३0 वाजताच्या सुमारास शासकीय वाहनाने कारंजाहून मानोराकडे जात असताना त्यांना इंझोरी ते कुपटा यादरम्यान विरुद्ध दिशेने अवैध वाळू भरलेला ट्रक (क्रमांक एमएच २८ बी-८७८८ ) जाताना दिसला. त्यांनी त्यास हात दाखवून ट्रक थांबविण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने भरधाव ट्रक पळविला. त्यांनतर पथकाने ट्रकचा पाठलाग सुरू केला. बायपासवर ह्यबॅरिकेड्सह्ण लावून नाकाबंदी केली; परंतु ट्रकने ह्यबॅरिकेड्सह्णला कट मारून मंगरूळपीरच्या दिशेने पळ काढला. शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक राम सुरवसे यांनी या ट्रकला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकचालकाने त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ते यातून बचावले. दरम्यान, ट्रक मंगरूळपीरच्या दिशेने भरधाव पळविला. परंतु पोलिसांनी या ट्रकला कारंजा ते मंगरूळपीर मार्गावरील पोटी फाट्याजवळ शिताफीने पकडले. या ट्रकमध्ये चालकासह एकूण तीन ते चार व्यक्ती होते. मात्र, त्यातील दोघे पसार झाले. चालकासह वाळूचा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाईसाठी कारंजा ग्रामीण पोलिसांकडे सुपुर्द केला आहे. या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता.