अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फेज क्रमांक ४ मध्ये असलेल्या वर्धमान दाल मिल येथून तुरीची डाळ चोरी करणाऱ्या चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.
एमआयडीसीमधील वर्धमान उद्योग दालमिलमधून २२ पोते तूरडाळ अज्ञात चोरट्यांनी पळविली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
या प्रकरणात पोलिसांनी विजय देवीलाल गोयल ४० वर्षे राहणार शिवर यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदार शरद तायडे, प्रेम मोरे, सुमेध शिरसाट, राकेश यांना अटक केली. त्यांच्याकडून तूरडाळ पोलिसांनी जप्त केली असून आणखी २ साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. या चोरट्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.