शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

तूर उत्पादक शेतकरी हतबल!

By admin | Published: April 14, 2017 1:42 AM

अकोला- ‘नाफेड’द्वारे खरेदी बंद करण्यात येत असल्याने, तूर कोठे आणि कोणाला विकणार, या विवंचनेत जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

‘नाफेड’ची खरेदी उद्यापासून बंद!

संतोष येलकर - अकोलाहमी दराने तूर विक्री करण्यासाठी ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवर गत दीड महिन्यांपासून उभ्या असलेल्या ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप अद्याप झाले नसताना, खरेदी १५ एप्रिलपासून बंद करण्यात येत आहे. बाजारात व्यापाऱ्यांकडून तुरीला योग्य भाव मिळत नसताना ‘नाफेड’द्वारे खरेदी बंद करण्यात येत असल्याने, तूर कोठे आणि कोणाला विकणार, या विवंचनेत जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये हमीदराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यात अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या एका खरेदी केंद्रावर तूर खरेदी करण्यात येत असून, अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा या चार ठिकाणी खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येत आहे. खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, त्या तुलनेत तूर खरेदीची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. बारदान्याचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या इत्यादी कारणांमुळे तूर खरेदीत वारंवार अडथळा निर्माण होत असून, खरेदी केंद्रांवर तुरीच्या मोजमापासाठी प्रचंड विलंब होत आहे. खरेदी केंद्रांवर तुरीच्या मोजमापासाठी शेतकऱ्यांना एक-दीड महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत २६ फेबु्रवारीपर्यंत नोंदणी झालेल्या ४०० ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप १३ एप्रिलपर्यंत रोजी होऊ शकले नाही. गत दीड महिन्यांपासून बाजार समिती परिसरात तुरीचे ट्रॅक्टर मोजमापाच्या प्रतीक्षेत उभे असतानाच १५ एप्रिलपासून ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी करण्यात येणार आहे. बाजारात व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विंटल ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रुपये दराने तूर खरेदी केली जात आहे. बाजारात तुरीला योग्य भाव मिळत नसताना, नाफेडद्वारे हमी दराने तूर खरेदी बंद करण्यात येत असल्याने, तूर कोणाला विकणार, असा प्रश्न जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. सायंकाळी काटा होणार बंद!मोजमापाच्या प्रतीक्षेत शेकडो तुरीची वाहने उभी असतानाच १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता काट बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्रांवर गत दीड महिन्यांपासून आणलेली तूर कोणाला विकणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.टोकन दिलेल्या तूर खरेदीचे काय?अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात १२० ट्रॅक्टरमधील तुरीच्या मोजमापासाठी शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहे; मात्र १५ एप्रिलपासून नाफेडमार्फत तूर खरेदी बंद होत आहे, त्यामुळे टोकन देण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचे काय, असा प्रश्न आहे.शेतकऱ्यांच्या तुरीची आवक होईल, तोपर्यंत खरेदी करण्यात यावी, अशी भूमिका यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची गरज असून, त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे.- संजय धोत्रे, खासदारनाफेडद्वारे तूर खरेदी १५ एप्रिलपासून बंद करण्यात येत असली तरी, बाजार समितीमध्ये असलेल्या सर्व ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप करून खरेदी करण्यात आली पाहिजे. खरेदीसाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली पाहिजे.- शिरीष धोत्रे, सभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीखरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात आहे; गत दीड महिन्यांपासून तुरीचे मोजमाप करण्यात आले नाही. मोजमापाच्या प्रतीक्षेत असतानाच नाफेडमार्फत तूर खरेदी बंद करण्यात येत आहे. नाफेडद्वारे खरेदीला मुदतवाढ मिळाली पाहिजे.- गजानन पावसाळे, उपाध्यक्ष, अकोला तालुका खरेदी-विक्री संघनाफेडद्वारे तूर खरेदी १५ एप्रिलपासून बंद करण्यात येत असल्याबाबत महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालकांचे पत्र १२ एप्रिल रोजी प्राप्त झाले. त्यानुसार खरेदी बंद करण्यात येणार आहे.- जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी