खरेदी-विक्री व्यवस्थापकाची पोलिसात तक्रारतेल्हारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडची तूर खरेदी चालू असून, बाजार समितीच्या टीनशेडमध्ये थप्पी मारून ठेवलेल्या गंजीत २७ कट्टे अदलाबदल झाल्याची तक्रार खरेदी-विक्रीचे व्यवस्थापक वसंतराव बोडखे यांनी २७ एप्रिलला तेल्हारा पोलिसात दिली.बाजार समितीच्या यार्डमध्ये नाफेडची तूर खरेदी चालू असून, २१ व २२ एप्रिल रोजी खरेदी केलेली तूर अकोला येथे पाठविण्यासाठी वाहन न मिळाल्याने पोते बाजार समितीच्या यार्डमध्ये गंजी मारून ठेवण्यात आले. पोत्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी बाजार समितीची असताना २२ एप्रिलच्या रात्री २७ कट्टे तुरीची अदलाबदल करण्यात आल्याची तक्रार व्यवस्थापकाने केली. तक्रारीमध्ये २३ एप्रिल रोजी सदर तूर एमएच ३० एल ४४२८ क्रमांकाच्या वाहतनात अकोला येथे पाठविली होती; परंतु त्यातील २७ कट्टे तूर संशय आल्याने परत आल्यामुळे आपण त्याची माहिती बाजार समितीच्या सचिवांना दिली; मात्र त्यांनी काही चौकशी न केल्याने २७ एप्रिल रोजी तेल्हारा पोलिसात तशी तक्रार दिली. बाजार समितीच्या आवारात ठेवलेली तूर अदलाबदल झाली कशी, याबाबत चर्चा सध्या जोरात आहे.
बाजार समितीमध्ये ठेवलेली तूर बदलली
By admin | Published: May 02, 2017 7:27 PM