अकोला: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मलकापूर- अकोला शाखा व श्री शिवाजी महाविद्यालय मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गणपतराव जाधव व लक्ष्मीबाई जाधव स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय गणलक्ष्मी करंडक एकपात्री साभिनय स्पर्धा शनिवारी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात पार पडली.
या स्पर्धेत कारंजाचा तुषार काकड हा गणलक्ष्मी करंडकचा मानकरी ठरला. कारंजाचा तुषार काकड याला ' गणलक्ष्मी करंडक ' व रंगकर्मी विशाल डीक्कर स्मृती प्रीत्यर्थ रु. ५५५५/- रोख तर साहेबराव देशमुख स्मृतिप्रीत्यर्थ रु. ३३३३/- ( स्मृतिचिन्ह ) द्वितीय पुरस्कार ठाण्याचा सिध्देश शिंदे यास तर वसंतराव रावदेव स्मृतिप्रीत्यर्थ तृतीय पुरस्कार व स्मृतिचिन्ह अमरावतीची प्राची ढोके हिला प्रदान करण्यात आला. आप्पासाहेब काटे स्मृतिप्रीत्यर्थ रु . ११११/- रोख चतुर्थ पुरस्कार वाशीमचा अनिल खोलगडे तर नरबदाबाई काटे स्मृतिप्रीत्यर्थ रु. ११११/- रोख पाचवा पुरस्कार वर्ध्याची रसिका मुळे हिला प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ रंगकर्मी दादासाहेब रत्नपारखी स्मृतिप्रीत्यर्थ प्रत्येकी रोख रु. ५०१/- असे उत्तेजनार्थ पांच पुरस्कार - १) मयूर भालतिलक , अकोला २) ऋषिप्रकाश रत्नपारखी , खामगाव ३) मोनाली खुरकुटे , बुलडाणा ४) नंदिनी देशमुख , अकोला ५) केतकी क्षीरसागर , अकोला, तर अरुण घाटोळे पुरस्कृत ' श्याम - कमल ' लक्षवेधी पुरस्कार रु. ५०१ /- अमरावतीच्या सौरव अढाऊ याला प्रदान करण्यात आला. पारितोषिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे होते ,तर सिने कलावंत व माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. हरीश इथापे ( वर्धा ) , सुरेश बारसे (अमरावती) , व अरुण घाटोळे ( अकोला ) ही परीक्षकत्रयी तथा स्पर्धा संयोजक व शाखा अध्यक्ष प्रा. मधू जाधव , कार्याध्यक्ष डॉ गजानन नारे , कार्यवाह अशोक ढेरे आदी मंचावर उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा. मधू जाधव यांनी केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन स्नेहल कहाळे हिने केले. आयोजनात सचिन गिरी , संजय पाटील , प्रशांत गावंडे यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष होते.