मूर्तिजापूर : हातगाव येथील शाळेत पुण्याहून आलेल्या सदानंद इंगळे याला क्वारंटीन करण्यात आले होते. दरम्यान, त्याने शाळेच्या दाराचे कुलूप तोडून दोन टीव्ही संच लंपास केल्याची घटना २० जून रोजी घडली होती. या प्रकरणात मूर्तिजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास करून सदानंद इंगळे यास मुद्देमालासह अटक केली.हातगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील व अंगणवाडीतील शैक्षणिक कामासाठी वापरण्यात येणारे टेलीव्हिजन संच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २० जून रोजी घडली होती. शाळेतील शिक्षक गोवर्धन हरिभाऊ तामसे हे शाळेत गेल्यावर त्यांना शाळेत ३0 हजार रुपये किमतीचे दोन टीव्ही संच दिसून आले नाहीत. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास करून पुण्यातून गावात आलेला सदानंद प्रभाकर इंगळे (३१) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने शाळेत क्वारंटीन असताना टीव्ही संच चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला व त्यास अटक केली. पोलीस ठाणेदार शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आशिष शिंदे, हेड कॉन्स्टेबल गणेश ढोके, संजय भारसाकळे, योगेश उमक, आकाश वाघमारे, मनिष मालठाणे, संजय वाघ,अमोल भांड यांनी ही कारवाई केली. (शहर प्रतिनिधी)फोटो