अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवार, १३ एप्रिल रोजी आणखी १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ५२८ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २३१, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये १३७ अशा ३६८ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३१,३९४ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,२२२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९९१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अमाखाँ प्लॉट व मोठी उमरी येथील प्रत्येकी नऊ, कौलखेड, खडकी, गोरक्षण रोड, गीता नगर, पारस कॉलनी व मलकापूर येथील प्रत्येकी पाच, जीएमसी, बार्शीटाकळी, राम नगर व तोष्णीवाल लेआऊट येथील प्रत्येकी चार, पिंजर, कोलोरी, रणपिसे नगर व राऊतवाडी येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड, बोरगाव मंजू, बाळापूर, अकोट, ख्रिरपूर, शिवार, जठारपेठ, देवकी नगर व हरिहर पेठ येथील प्रत्येकी दोन, हिंगणा, गोकूल कॉलनी, न्यू बस स्टँड, लक्ष्मी नगर, गड्डम प्लॉट, वनीरंभापूर, देशमुख फैल, सोपीनाथ नगर, शिवाजी नगर, पार्वती नगर, निंभोरा,पैलपाडा, देगाव, दहिहांडा, तेल्हारा, पातूर, मांडोली, कंळबा ता.बाळापूर, हसनापूर, गोकूल कॉलनी, खामखेड, पारस, शेलद, राजीव गांधी नगर, रिंग रोड, दानोरी ता.अकोट, राधेनगर, गौतम रोड, सिंधी कॅम्प, रतनलाल प्लॉट, लहान उमरी, तेल्हारा, जवाहर नगर, व्याळा ता.बाळापूर, वर्धमान नगर, मातानगर, शिवनी, महाकाली नगर, शिवसेना वसाहत, गोपालखेड, वाडेगाव, रामदासपेठ व विराहित येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सायंकाळी मुर्तिजापूर येथील ११, बार्शीटाकळी येथील नऊ, कौलखेड येथील सात, मलकापूर येथील पाच, खडकी येथील चार, राऊतवाडी, मोठी उमरी व पिंजर येथील प्रत्येकी तीन, बहादुरा, रामदासपेठ, डाबकी रोड, जवाहर नगर, बलवंत कॉलनी, खदान व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी दोन, नया अंदुरा, खेडकर नगर, आपातापा रोड, निबंधे प्लॉट, जपान जीन, अनिकट, अगरवेस, माळीपुरा, तार फैल, रिगल टॉकीज, अंबिका नगर, जूने शहर, विजय नगर, सिंधी कॅम्प, तेल्हारा, निमवाडी, रिंग रोड, लेडी हार्डीग रोड, पिकेव्ही, शिवार, आरटीओ रोड, हरिहर पेठ, लक्ष्मी नगर, कच्ची खोली, किर्ती नगर, गिरी नगर, नर्सीग हॉस्टेल, तरोडी, जीएमसी, आळशी प्लॉट, रतनलाल प्लॉट, हिंगणा फाटा, नफेवाडी, वाडेगाव ता.बाळापूर व धानेगाव ता.बाळापूर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
पाच महिला, सात पुरुषांचा मृत्यू
हमजा प्लॉट, जूने शहर येथील ४४ वर्षीय महिला, नायगाव येथील ४० वर्षीय महिला, आळसी प्लॉट येथील ६५ वर्षीय महिला, पारस येथील ४२ वर्षीय पुरुष, शास्त्री नगर येथील ८१ वर्षीय पुरुष, भरतपूर ता.बाळापूर येथील ७४ वर्षीय पुरुष, शिवसेना वसाहत येथील ५८ वर्षीय पुरुष, खदान येथील ७४ वर्षीय पुरुष व दगडपारवा येथील ३६ वर्षीय पुरुष अशा नऊ रुग्णांचा मंगळवारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सायंकाळी खाजगी रुग्णालयातून तिघांचा मृत्यूची नोंद झाली. त्यात मुर्तिजापूर येथील ८० वर्षीय पुरुष, तेल्हारा येथील ५५ वर्षीय महिला व कोठारी वाटीका नं.८ येथील ४५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
३३० जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५२, देवसार हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील एक, ॲक्विन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील एक, हैदर उम्मत हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील १०, आयकॉन हॉस्पीटल येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, युनिक हॉस्पीटल येथील एक, बाईज हॉस्टेल दोन, आयुर्वेदिक महाविद्यालय येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील चार, तर होम आयसोलेशन येथील २२८, अशा एकूण ३३० जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.
३,७७३ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१,३९४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २७,०९३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५२८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३,७७३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.