लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : कालच ‘कंटेनमेन्ट झोन’मुक्त झालेल्या पातुरातील सासरवाडीत कोरोना ‘पॉझिटिव्ह’ जावयाने हजेरी लावल्याने सासरवाडीतील संदिग्ध बारा जणांना वैद्यकीय तपासणीसाठी मंगळवारी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले.अकोला नायगाव येथील एक जावई ११ मे रोजी पातुरातील सासरवाडीत आला होता. १८ मे रोजी अकोल्यात गेल्यानंतर जावयामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे त्याला सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आल्यामुळे पातुरातील सासरवाडीत खळबळ उडाली. जावयाशी संपर्क आलेल्या सासरवाडीतील बारा जणांना मंगळवारी वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मंगळवारीच पातूर शहर ‘कंटेनमेन्ट झोन’मुक्त झाल्याने पातूरवासीयांना दिलासा मिळाला होता; मात्र बारा रुग्ण कोरोना संदिग्ध निघाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच देशाच्या रेड झोन क्षेत्रातून २० मेपर्यंत ६१७ सह ८४८ प्रवासी दाखल झाले असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. पातूर शहराच्या चेकपोस्टवरील कर्मचारी हजर आढळून येत नसल्याने तालुका आणि शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्येची आता नोंद घेतली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील काळात कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
‘पॉझिटिव्ह’ जावयामुळे सासुरवाडीचे बारा जण रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:04 AM