हिवरखेड : अकोट वन्यजीव विभागांतर्गत येत असलेल्या वन परीक्षेत्र हिवरखेड वनअधिकार्यांनी सातपुड्यातून येत असलेले अवैध सागवान जप्त केल्याची घटना २१ जून बुधवारच्या पहाटे घडली.२१ जूनच्या पहाटे वन विभागाचे पथक गस्तीवर असताना हिवरखेड-सोनाळा मार्गावर अवैध सायकलवर मोठय़ा सागवान चरपटा सातपुड्यातून आणत असताना पथकाच्या निदर्शनास आले. वन कर्मचार्यांनी पाठलाग केला असता सायकली सागवानसह तेथेच टाकून चोरटे पसार झाले. २0 हजार रुपये किमतीचे अवैध सागवान जप्त करण्यात आले. सदर कारवाई वन परीक्षेत्र अधिकारी सुरेश खराटे, वनकर्मचारी अनिल मोरे, राजपाल तेलगोटे, कैलास चौधरी, अनिल चिमोटे, मोहन कासदेकर, प्रल्हाद निंबोकार यांनी केली. अज्ञात भगवान चोरट्याविरुद्ध वनकायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)
वीस हजाराचे अवैध सागवान जप्त
By admin | Published: June 21, 2017 6:11 PM