पहिली ते आठवीची तालुकानिहाय विद्यार्थी
अकोला पं.स.- ९१६७४
अकोट- ३४४५५
बाळापूर- २५५२४
बार्शीटाकळी- १७०११
मूर्तिजापूर- २००६३
पातूर- १७१६५
तेल्हारा- २१८४२
मनपा क्षेत्र- ७४७९
.....................................
एकूण- २३५२१३
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविण्याचा शासनाने योग्य निर्णय घेतला. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे परीक्षा नाही घेतली तरी, काही फरक पडणार नाही.
-रामदास होपळ, मुख्याध्यापक, जि.प. प्राथमिक शाळा, वरूर
कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर शासनाने योग्य निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा न घेणे योग्य आहे. परीक्षा न घेतल्यामुळे काही बिघडणार नाही. तसाही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविण्यावर भर देण्यात येत आहे.
-संजय बरडे, मुख्याध्यापक, जि.प. आंतरराष्ट्रीय शाळा दिग्रस बु.
परीक्षा घेतल्या असत्या तर विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी शाळेत यावे लागले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, विद्यार्थ्यांच्या जीवितालाही धोका होता. परीक्षा न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून अध्यापन सुरूच आहे.
-समाधान सोर, मुख्याध्यापक, जि.प. प्राथमिक शाळा, वाडेगाव