अकाेला : जुने शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रहीवासी कल्पेश उपाध्याय यांनी साेमवारी रात्री गळफास लाउन आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात जुने शहर पाेलिसांनी शिवसेना उपशहर प्रमूख याेगेश अग्रवाल व शिरीष दांदळे या दाेघांना मंगळवारी अटक केली़. त्यांना न्यायालयासमाेर हजर केेले असता न्यायालयाने आराेपीस ६ ऑगस्टपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली़.
कल्पेश उपाध्याय यांनी याेगेश अग्रवाल रा़ गाैरक्षण राेड व शिरीष दांदळे रा़ गजानन नगर डाबकी राेड या दाेघांकडून व्याजाने पैसे घेतले हाेते़. त्यांच्यातील आर्थिक देवाण घेवाण तब्बल ४० ते ५० लाख रुपयांच्या घरात गेल्यानंतर या दाेन आराेपींनी कल्पेश उपाध्याय यांना पैशाची मागणी सुरु केली़. मात्र पैसे नसल्याने त्यांनी काही दिवसांचा अवधी मागीतला असता दाेन्ही आराेपींनी कल्पेश उपाध्याय यांना प्रचंड टार्चर केले़. या दबावातूनच कल्पेश उपाध्याय यांनी गळफास लाउन आत्महत्या केली़. मात्र आत्महत्या करण्यापुर्वी लिहीलेल्या सुसाइट नाेटमध्ये याेगेश अग्रवाल व शिरीष दांदळे यांच्या त्रासामुळेच आत्महत्या करीत असल्याचे लिहुन ठेवले़. त्यामूळे जुने शहर पाेलिसांनी या प्रकरणी दाेघांविरुध्द साेमवारी रात्री गुन्हा दाखल करून मंगळवारी दाेन्ही आराेपींना अटक केली़. या दाेन्ही आराेपींना मंगळवाीच न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ६ ऑगस्टपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे़. या प्रकरणाचा तपास जुने शहर पाेलिस करीत आहेत़.