लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागपुरात पित्याचा खून करून पसार झालेल्या मुलगी व जावयाला अकोला रेल्वे पोलिसांनी १६ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३0 वाजता अटक केली. दोन्ही आरोपींना रात्री उशिरा नागपूर पोलिसांच्या स्वाधिन केले. नागपुरातील मानसिंग कुंवरसिंग शिव (५५) यांची त्यांची मुलगी किरण विजय तिवारे आणि जावई विजय अशोक तिवारे यांनी कौटुंबिक कलहातून हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह सुटकेसमध्ये भरून ते रेल्वे स्टेशनकडे ऑटोने येत होते. ऑटो चालकाला संशय आल्याने, त्याने पोलिसांना माहिती दिली. तेव्हापासून पोलीस या दाम्पत्याचा मागावर होते. या दाम्पत्याचे सीसी कॅमेर्यातील फुटेज सर्व पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आले होते. अकोला रेल्वे पोलिसांनाही याविषयी माहिती देण्यात आली होती. या माहितीवरून अकोला पोलिसांनी नागपूरवरून आलेल्या रेल्वेगाड्यांची तपासणी केली असता, रात्री ११.३0 वाजता हे दाम्पत्य दिसताच पोलिसांनी त्यांना अटक केली. ही कारवाई अकोला जीआरपीएफचे ठाणेदार सॅम्युअल वानखडे व त्यांच्या पथकाने केली. रात्री उशिरा या दाम्पत्याला नागपूर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.
नागपुरात खून करणार्या दोघांना अकोल्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 2:37 AM
अकोला : नागपुरात पित्याचा खून करून पसार झालेल्या मुलगी व जावयाला अकोला रेल्वे पोलिसांनी १६ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३0 वाजता अटक केली. दोन्ही आरोपींना रात्री उशिरा नागपूर पोलिसांच्या स्वाधिन केले.
ठळक मुद्देअकोला जीआरपीएफची कारवाईरात्री उशिरा दोन्ही आरोपींना केले नागपूर पोलिसांच्या स्वाधिन