मालक फरार गुन्हा दाखल
अकोला : तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेल्हारा अडसूळ रोडवर देशी व विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक व विक्री करणाऱ्या दोघांना दहशतवाद विरोधी कक्षाने बुधवारी अटक केली. त्यांच्याकडून 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी मालक फरार होण्यात यशस्वी झाला.
तेल्हारा अडसूळ रोडवर दहिगाव कमान परिसरात प्रकाश बापुराव घनबहादुर वय 35 वर्षे राहणार दहिगाव व त्याचा साथीदार सत्यविजय प्रल्हादराव निमकर्डे वय 46 वर्षे राहणार दहिगाव हे दोघे एका दुचाकीवर देशी व विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी दारू सह 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दीपक इंगळे राहणार दहीगाव हा या व्यवसायाचा मालक असून तो फरार होण्यात यशस्वी झाला. या तिघांविरुद्ध तेलारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दहशतवाद विरोधी कक्षाने केली.