- विजय शिंदेअकोट (जि.अकोला) : अकोट तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पणज व आलेवाडी या गावाजवळील पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे अकोट शेगाव हा मार्ग सकाळपासून बंद आहे.अकोट तालुक्यात व सातपुड्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली त्यामुळे नदी-नाल्यांना मोठा पूर आला आहे. अकोट शेगाव मार्गावरील देवरी फाटा नजीक असलेल्या आलेवाडी गावाजवळ नदी नदीला पूर आल्यामुळे पुल वाहुन गेला आहे. सोबतच पुलावरील मोठे पाईप सुद्धा वाहून गेले आहे. सध्या नदीला पूर असल्यामुळे अकोट- शेगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच पणज गावा जवळील बोर्डी नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. नदीवर बांधलेला कच्चा पुल वाहून गेल्यामुळे एक कुपनलिका चा ट्रक नदीत पलटी होऊन पडला आहे. विशेष म्हणजे अकोट तालुक्यात अंजनगाव- शेगाव- अकोला या मार्गाचे कामे सुरू आहेत. त्यामुळे या रस्त्यावर चिखल साचला आहे. तसेच ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्यामुळे कच्चे पूल वाहून जात आहे. पुल व रस्ता बांधकामाला गती दिली नाही. त्यामुळे या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वारंवार वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.
अकोट तालुक्यातील दोन पुल वाहून गेले; अकोट -शेगाव मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:06 PM