शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

अकोल्यातील दोन सराफा मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 11:03 AM

चोरट्यांनी चोरीचे सोने अकोल्यातील दोन सराफांना विक्री केल्याच्या माहितीवरून मध्य प्रदेश पोलिसांनी अकोल्यातील दोन सराफांना गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मध्य प्रदेशातील इंदोर क्राइम ब्रांचने काही अट्टल चोरट्यांना अटक केली असून, या चोरट्यांनी चोरीचे सोने अकोल्यातील दोन सराफांना विक्री केल्याच्या माहितीवरून मध्य प्रदेशपोलिसांनी अकोल्यातील दोन सराफांना गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. यामध्ये शेखर अग्रवाल व अजय गोयनका या दोन सराफांचा समावेश आहे.इंदोर क्राइम ब्रांचने घरफोडी तसेच सोन्याचे दागिने व चांदी आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामधील काही चोरट्यांनी चोरीचे सोने अकोल्यातील सराफांना विकल्याची माहिती क्राइम ब्रांचच्या पोलीस अधिकाऱ्यांना तपासादरम्यान दिली. यावरून इंदोर क्राइम ब्रांचचे एक पथक गुरुवारी रात्री अकोला दाखल झाले.त्यांनी चोरीचे सोने खरेदी करणाºया राजेश ज्वेलर्सचा संचालक शेखर राजेश अग्रवाल व राजश्री ज्वेलर्सचा संचालक अजय हनुमानप्रसाद गोयनका या दोघांना सराफा बाजारातून ताब्यात घेतले. या दोन सराफांनी चोरीतील ८८ ग्रॅम सोन्याचे दागिने व ४८० ग्रॅम चांदी खरेदी केल्याची माहिती चोरट्यांनी पोलिसांना दिली.या माहितीवरून मध्य प्रदेश पोलिसांनी दोन्ही सराफांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू केली आहे.या दोन्ही सराफांना ताब्यात घेण्यापूर्वी मध्यप्रदेश पोलीस अकोल्यात दाखल झाल्यानंतर त्यांची कायदेशीर नोंद त्यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला केली. तसेच या संदर्भातील माहिती सिटी कोतवाली ठाणेदार उत्तमराव जाधव यांनाही देण्यात आली.त्यानंतरच अकोल्यातील दोन सराफांना ताब्यात घेऊन पोलीस रवाना झाले आहेत. या घटनेमुळे अकोल्यातील सराफा बाजार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश