अकाेला : जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये तसेच निवडणुक पुर्व खबरदारी म्हणून पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हयातील दोन गुन्हेगारांना सहा महीन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. अकोट उपविभागातील हिवरखेड व तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोघांना अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने सहा महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
जिल्हयातील अकोट उपविभागातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील अमोल चंद्रभान पाटोळे वय ३० वर्ष रा. खंडाळा ता आकोट, तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राधेश्याम केशव म्हसाये रा. वरखेड ता तेल्हारा या दाेघांना मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ (अ) (ब) अन्वये अकोट उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेशाने जिल्हयातुन सहा महिन्याकरीता हद्दपार करण्यात आले आहे.
जिल्हयातील ३० सराईत गुन्हेगार हद्दपार
अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर कारवाइ करण्यात येत आहे. पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या कार्यकाळात ३० जणांवर कारवाइ करण्यात आली आहे. निवडणुका आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.