शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांन विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
4
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
5
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
6
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
8
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
9
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
10
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
11
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
12
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
13
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
14
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
15
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
16
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
17
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश
18
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
19
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
20
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला दाेन दिवसांचा ‘पीसीआर’

By आशीष गावंडे | Published: August 26, 2024 8:00 PM

न्यायालयाकडून पाेलिस काेठडीत वाढ

अकोला: दहा वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीला धमक्या देत तीच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्याची घटना २३ ऑगस्ट राेजी समाेर आली हाेती. याप्रकरणी अकाेटफैल पाेलिसांनी २० वर्षीय आराेपी यश युवराज गवइ या नराधमाला अवघ्या पाच तासात बेड्या ठाेकून न्यायालयात हजर केले असता, त्याला २६ ऑगस्ट पर्यंत पाेलिस काेठडी मिळाली हाेती. साेमवारी या आराेपीला न्यायालयात पुन्हा हजर केले असता, त्याला पुन्हा दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली. 

तेल्हारा तालुक्यातील एक कुटुंब काही कामानिमीत्त अकाेटफैल पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील वल्लभनगर येथील नातेवाईकांकडे आले होते. ते त्यांच्या अल्पवयीन मुलीला नातेवाईकांकडे ठेवून बाहेर गेले हाेते. यावेळी मुलीच्या वडीलांचा नातेवाईक असलेल्या यश युवराज गवई याने दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. हा प्रकार पिडीत चिमुकलीने आई-वडिलांना सांगितल्यानंतर पिडीतेच्या वडीलांनी २३ ऑगस्टच्या मध्यरात्री अकोटफैल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. याप्रकरणी पाेलिसांनी आराेपी यश गवइ याच्या विराेधात बीएनएस कलम ६४, ६४ (२), (एफ), (एम), ६५, (२), ३३३, ३५१(२) (३), तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४, ५ (एल)(एम)(एन), ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला करुन त्याला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.डी.क्षिरसागर यांच्या समक्ष हजर केले असता, २६ ऑगस्ट पर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली हाेती. साेमवारी या आराेपीला पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली. वारंवार अत्याचार; काेठडीत वाढवडिलांचा नातेवाइक असलेला आराेपी हा तेल्हारा येथे गेल्यानंतर मुलीला धमकावून तीच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करायचा. भितीपाेटी या चिमुकलीने अनेक दिवस हा अत्याचार सहन केला. सुनावणीदरम्यान ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. या संवेदनशिल प्रकरणाचा तपास अकाेटफैलचे प्रभारी ठाणेदार सहाय्यक पाेलिस निरीक्षक गजानन राठाेड, सहाय्यक पाेलिस निरीक्षक चंद्रकला मेसरे करीत आहेत.

टॅग्स :Molestationविनयभंग