लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तालुक्यातील वडगाव रोठे शिवारातील बरिंगे यांच्या शेतातील विहिरीत बुलडाणा जिल्ह्यातील वानखेड येथील श्रीकृ ष्ण सुरेश सोळंके याची हत्या करून प्रेत टाकण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या लक्ष्मण डाबेराव यास तेल्हारा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २२ नोव्हेंबरपर्यंंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी अद्यापही पसार आहेत. वडगाव रोठे येथील एका कोरड्या विहिरीत पोलिसांना मानवी सांगाळा आढळून आला होता. सदर मानवी सांगडा एक वर्षापासून बेपत्ता असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील श्रीकृष्ण सोळंके यांचा असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी १६ नोव्हेंबर रोजी सुरेश संपत सोळंके यांच्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी गजानन देवीदास सोळंके (काकनवाडा), रामसिंग देवसिंग सोळंके (निवाना), लक्ष्मण नरसिंग डाबेराव रा. वडगाव रोठे यांच्याविरुद्ध भादंवि ३0२, २0१, ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला होता. लक्ष्मण डाबेराव याला पोलिसांनी त त्काळ अटक केली होती. तो आजारी असल्याने त्याला शासकीय ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे उपचारार्थ भरती करण्यात आले होते. २0 नोव्हेंबर रोजी त्याला तेल्हारा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २२ नोव्हेंबरपर्यंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या हत्या प्रकरणातील अन्य दोन आरोपींचा शोध तेल्हारा पोलीस घेत आहेत.
खून प्रकरणातील आरोपीस दोन दिवसांची कोठडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:50 PM
तेल्हारा : तालुक्यातील वडगाव रोठे शिवारातील बरिंगे यांच्या शेतातील विहिरीत बुलडाणा जिल्ह्यातील वानखेड येथील श्रीकृ ष्ण सुरेश सोळंके याची हत्या करून प्रेत टाकण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या लक्ष्मण डाबेराव यास न्यायालयाने २२ नोव्हेंबरपर्यंंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठळक मुद्देश्रीकृ ष्ण सोळंके हत्या प्रकरणवडगाव रोठे शिवारातील विहिरीत टाकले होते प्रेतआरोपी लक्ष्मण डाबेराव यास २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी