--बॉक्स--
दोन दिवसांत नऊ लाखांचा तोटा
अकोला आगाराला एका दिवसाला सात लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न होत होते. दोन दिवसांत फेऱ्या घटल्याने एका दिवसाचे उत्पन्न अडीच लाखांवर आले आहे.
वीक एण्ड लॉकडाऊनमुळे शनिवारी केवळ ९.५ हजार किमी अंतर बस धावली. प्रवासी नसल्याने अनेक एसटी बसेस रद्द करण्यात आल्या. केवळ १७-१८ बसेस एका दिवसाला धावल्या.
दोन दिवसांमध्ये एसटी महामंडळाला नऊ लाखांचा तोटा झाला. तर दोन दिवसांत केवळ पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असले तरी लाखो रुपयांचा फटका महामंडळाला बसला आहे.
--बॉक्स--
कार्यालयीन कर्मचारीही कमी
शनिवारी, रविवारी वीक एण्ड असल्याने बहुतांश कार्यालयीन कर्मचारी सुटीवर होते. तर जेवढे शेड्यूल होता तेवढे कर्मचारी कामावर होते. वाहनचालक व वाहक यांची ड्युटी लावण्यात आली होती. प्रवासी संख्यापाहून बसेस सोडण्यात येत असल्याने चालक व वाहकांला सुटी नव्हती.
--बॉक्स--
१८ दोन दिवसांत धावलेल्या बसेस
५ लाख रुपये मिळाले दोन दिवसांत
९ लाख झाला तोटा दोन दिवसांत