अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार २९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २९३ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४०, तर रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये तीन अशा एकूण ४३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ९३८८ वर गेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २६३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २२३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये न्यू खेतान नगर येथील चार, आदर्श कॉलनी व कीर्ती नगर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन, गीता भवन, व्ही एच बी कॉलनी गोरक्षण रोड, महसूल कॉलनी, राम नगर, सत्यदेव नगर, मूर्तिजापूर, नांदखेड ता. अकोट, पंचशील नगर, गोडबोले प्लॉट, किनखेड पूर्णा ता. अकोट, धामना ता. अकोट, गोरक्षण रोड, शंकर नगर, जवाहर नगर, रामदास पोलीस क्वॉर्टर, लहान उमरी, वाशिम बायपास, सातव चौक, बळवंत कॉलनी, जीएमसी हॉस्टेल, तेल्हारा, जीएमसी, कौलखेड, जिल्हा परिषद कॉलनी खडकी, अकोट व बाळापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
पारस व किनखेड येथील रुग्णांचा मृत्यूकोरोनावर उपचार घेत असलेल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील ६६ वर्षीय पुरुषाचा रविवारी मुत्यू झाला. त्यांना २० नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. अकोट तालुक्यातील किनखेड ( पूर्णा) येथील ६३ वर्षीय महिलेचा मुत्यू झाला. त्यांना २७ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
रॅपिड चाचण्यांमध्ये तीन पॉझिटिव्हरविवारी झालेल्या एकूण १०० रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यांमध्ये तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत २५१२८ चाचण्यांमध्ये १७७१ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
१८ जणांना डिस्चार्जरविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून सात, ओझोन हॉस्पीटल येथून एक, अकोला अॅक्सीडेंट क्लिनिक येथून दोन, हॉटेल रिजेंसी येथून एक, तर हॉटेल स्कायलार्क येथून दोन, अशा एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६२८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९३८८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८४६७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २९३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६२८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.