सर्वसाधारण जागेसाठी महिला आरक्षण काढण्यात आले. दोन जिल्हा परिषद जागेसाठी एक महिला एक सर्वसाधारण साठी निघाल्याने देगाव जिल्हा परिषद सर्कलचे वंचित बहुजन आघाडीचे राम गव्हाणकर इतर मागासवर्गीय प्रवर्गातून विजयी झाले होते. त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास ते पुन्हा देगाव या मतदारसंघात नशीब अजमावू शकतात. परंतु येथे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापतींचे पती देवानंद अंभोरे हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. मतदार संघात गठ्ठा मतांचा विचार करूनच उमेदवारी देण्याकडे राजकीय पक्षांचा कल राहणार आहे. मराठा, बौद्ध, माळी, कुणबी समाजातूनच उमेदवार दिला जाईल. या मतदारसंघात पंचायत समिती सदस्याची निवडणूक असल्याने शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या शारदा सोनटक्के यांचे भवितव्य जातीय समीकरणावर ठरणार आहे. अंदुरा जिल्हा परिषद सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख आ. नितीन देशमुख यांनी दोन जिल्हा परिषद सदस्य व चार पंचायत समिती सदस्य निवडून आणून वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला होता. या मतदारसंघात शिवसेना पंचायत समिती सदस्या अर्चना देशमुख यांना यावेळी वंचित बहुजन आघाडीला जोरदार टक्कर द्यावी लागणार आहे. एक सदस्य ‘वंचित’चा आहे. निमकर्दा पंचायत समितीचा सदस्य वंचित बहुजन आघाडीचा आहे. ओबीसी आरक्षणाचा फटका बसला तरी, महिला आरक्षण असल्याने दोन्ही महिला सदस्य व विद्यमान सदस्यांना मात्र उमेदवारीसाठी कसरत करावी लागणार आहे. जातीय समीकरणे पाहूनच उमेदवारी निश्चित होणार आहे.
दोन जि. प. सदस्य, चार पंचायत समिती सदस्यांना आरक्षणाचा फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:17 AM