अकोला - राष्ट्रीय महामार्गावर बाभूळगावनजीक भरधाव दुचाकीने पायदळ दिंडीत शेगाव येथे जात असलेल्या महिला भाविकास जबर धडक दिल्याची घटना बुधवारी घडली. या अपघातात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला असून, एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथून महिला व पुरुष वारकर्यांची पायदळ दिंडी शेगाव येथे जात असताना शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ एम एच ३0 इएल ५८0१ क्रमांकाच्या दुचाकीने ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात पायदळ दिंडीतील ताईबाई इंगळे (५५) या महिलेस जबर धडक दिली. या अपघातात इंगळे यांचा जागेवरच मृत्यू झाला. महिलेस उपचारासाठी तातडीने सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी शीलाबाई बोळे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम २७९, ३0४ अ, नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकीच्या धडकेत महिला भाविक ठार
By admin | Published: March 10, 2016 2:31 AM