अकोला : चान्नी आणि पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या चोऱ्यांमुळे या परिसरातील चोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांनी एका पथकाने गठन करून या परिसरात चोºया करणाºया दोन अट्टल चोरट्यांना शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल पाच घरफोड्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्य आधारे सदोसिंग सुधाकर चव्हाण (२५) रा. दधम, ता. खामगाव, जि. बुलडाणा, मोहन सुरेश चव्हाण (३५) रा. लोणी, ता. मेहकर, जि. बुलडाणा यांना त्यांच्या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही आरोपींकडून चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चार चोºयांची आणि पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका चोरीची अशा एकूण पाच चोºयांची कबुली या दोन चोरट्यांनी दिली. त्यांच्याकडून ५१ ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत अंदाजे २ लाख ५०, हजार रुपये ११ हजार रुपये किमतीची ७ तोडे चांदी, एक मोबाइत किंमत अंदाजे ४ हजार रुपये असा एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन चोरट्यांना रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सागर हटवार, प्रमोद डोईफोडे, आश्विन शिरसाट, शंकर डाबेराव, फिरोज शेख, मनोज नागमते, संदीप ताले, संजय निखाडे, अनिल राठोड, भाग्यश्री मेसरे, नीलेश चाटे, गोपाल ठोंबरे, गणेश सोनोने, ओम देशमुख यांनी केली.
पाच घरफोड्यातील दोन अट्टल चोरटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 10:55 AM