गत दोन दिवसांपासून परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे महान येथील काटेपूर्णा धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. सद्यस्थितीत महान धरणाचा जलसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाटबंधारे विभागाच्या जलाशय आराखड्यानुसार, दि. १६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान धरणात ९५ टक्के जलसाठा उपलब्ध झाल्यास उर्वरित साठा विसर्ग करावा लागतो. त्यामुळे शुक्रवार, दि. २० ऑगस्ट रोजी धरणाचे दोन गेट एका फुटाने उघडण्यात आले आहेत.
------------------------------
असा आहे धरणात जलसाठा
महान धरणात २० ऑगस्ट रोजी सकाळी ११४०.१२ फूट, ३४७.५१ मीटर, ८२.१७३ दलघमी व ९५.१६ टक्के एवढा जलसाठा उपलब्ध होता. परिसरात ४०८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही गेटमधून ५०.१६ घन.मी.प्र.से. असा विसर्ग करणे सुरू होते.
------------------
नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा
महान धरणात जलसाठ्यात वाढ होत आहे. सद्यस्थितीत हवामान खात्याच्या अंदाजनुसार, अतिवृष्टीचा इशारा आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा महान पाटबंधारे विभागाने दिला आहे.
--------------------------