शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

‘सीएसआयआर’अंतर्गत ‘जीएमसी’च्या दोन विद्यार्थ्यांना मिळणार संशोधन प्रशिक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 10:59 AM

विद्यार्थ्यांना ‘कर्करोग आणि आनुवंशिकशास्त्र’ या विषयावर संशोधन प्रशिक्षण दिले जाणार आहे.

- प्रवीण खेते लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वैज्ञानिक व औद्योगिक परिषद म्हणजेच ‘सीएसआयआर’अंतर्गत अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची प्रथमच संशोधन प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ‘कर्करोग आणि आनुवंशिकशास्त्र’ या विषयावर संशोधन प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी देशभरातून केवळ २० जणांची निवड करण्यात आली.‘सीएसआयआर’अंतर्गत सेंटर फॉल सेल्युलर आणि आण्विक जीवशास्त्र विभागातर्फे हैदराबाद येथे सोमवार, २३ डिसेंबरपासून या संशोधन प्रशिक्षणाला सुरुवात झाली. आधुनिक जीवशास्त्रातील सीमांत क्षेत्रातील ही एक प्रमुख संशोधन संस्था आहे. या संस्थेतर्फे ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांकडून दरवर्षी अर्ज मागविण्यात येतात. त्यापैकी केवळ २० विद्यार्थ्यांची निवड होते. यंदा अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे पहिल्यांदाच आकाश चौरेवार आणि आयुष गिंदोडिया या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली. हैदराबाद येथे २३ डिसेंबर २०१९ ते ३ जानेवारी २०२० या कालावधीत हे संशोधन प्रशिक्षण चालणार असून, यामध्ये या विद्यार्थ्यांना आनुवंशिकशास्त्र आणि कर्करोग या दोन विषयांवर संशोधनासाठी प्रोत्सहित करण्यात येईल. शिवाय, संशोधन कशा पद्धतीने करावे, याचेही प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने वैद्यकीय क्षेत्रात उच्च स्तरावर संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे.पदव्युत्तर पूर्व विद्यार्थ्यांच्या संशोधनाच्या पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून ‘सीएसआयआर’अंतर्गत होणारे हे संशोधन प्रशिक्षण महत्त्वपूर्ण आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी योग्य दिशा मिळते. यंदा पहिल्यांदाच जीएमसीच्या दोन विद्यार्थ्यांची यासाठी निवड होणे कौतुकास्पद आहे.- डॉ. शिवहरी घोरपडे,अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय