लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कत्तल करण्याच्या उद्देशाने दोन वाहनांमध्ये १६ बैलांना निर्दयीपणे कोंबून नेत असताना, कोतवाली पोलिसांनी रविवारी सकाळी दोन जणांना अटक केली. त्यांच्याकडून १६ बैल व दोन वाहनांसह एकूण ४ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोतवाली पोलिसांना दोन वाहनांमध्ये बैल कोंबून नेत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दगडी पूल येथे सापळा लावला. दरम्यान, येथून एमएच ३० एबी २२०६ आणि एमएच ०४ डीके ३४६२ क्रमांकाच्या दोन मालवाहू वाहनांमध्ये बैलांना कोंबून कत्तलीसाठी नेत असताना, पोलिसांनी वाहनचालक मजहरउद्दीन सिराजउद्दीन कुरेशी (२७ रा. कागजीपुरा) आणि ऐफाज अहमद अब्दुल सत्तार (३० रा. मुल्लानी चौक, सिंधी कॅम्प) ताब्यात घेतले. त्यांची पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांनी वाहनातून आम्ही बैल कत्तल करण्यासाठी नेत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी एमएच ३० एबी २२०६ क्रमांकाच्या वाहनातून पाच बैल तर एमएच ०४ डीके ३४६२ क्रमांकाच्या वाहनातील अकरा बैलांची सुटका केली. १६ बैलांची किंमत १ लाख २७ हजार रुपये आहे. आरोपी मजहरउद्दीन कुरेशी आणि ऐफाज अहमद यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. ही कारवाई ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमित डहारे, विपुल सोळंके, प्रशांत नेमाडे, शेख नदीम, नीलेश पाचपवार यांनी केली. आरोपींविरुद्ध पोलिसांची चौथ्यांदा कारवाईआरोपी मजहरउद्दीन सिराजउद्दीन कुरेशी, त्याचा भाऊ नाजिरोद्दीन आणि ऐफाज अहमद अब्दुल सत्तार हे सातत्याने गुरांना निर्दयीपणे वाहनांमध्ये कोंबून कत्तलीसाठी नेतात. तिघांवर जुने शहर, एमआयडीसी, रामदासपेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये ते एमएच ३० एबी २२०६ आणि एमएच ०४ डीके ३४६२ क्रमांकाच्या दोन मालवाहू वाहनांचा वापर करतात. पोलिसांनी तीनही कारवाईदरम्यान त्यांची ही मालवाहू जप्त केली होती, हे येथे विशेष.
कत्तलीसाठी बैलांना नेणारे दोघे गजाआड
By admin | Published: July 17, 2017 3:17 AM