- संतोष येलकरअकोला : जिल्ह्यात पाच तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीत ३ लाख १७ हजार २८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, १ लाख ९४ हजार ७७४ शेतकरी दुष्काळाच्या कचाट्यात सापडले आहेत.पावसातील खंड, भूजल पातळी व जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाली. या पृष्ठभूमीवर ३१ आॅक्टोबर रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील १५१ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील या पाचही तालुक्यांत ३ लाख १७ हजार २८४ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे १ लाख ९४ हजार ७७४ शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडले आहेत. त्यामध्ये दुष्काळग्रस्त पाचही तालुक्यांतील कोरडवाहू आणि बागायती शेतकऱ्यांचा समावेश आहे.दुष्काळग्रस्त तालुक्यात पीक नुकसानाचे असे आहे क्षेत्र!तालुका क्षेत्र (हेक्टर)अकोला ८६६२३बार्शीटाकळी ५१५६२तेल्हारा ५३०३६बाळापूर ६०५९१मूर्तिजापूर ६५४७२...............................................एकूण ३१७२८४तालुकानिहाय असे आहेत दुष्काळग्रस्त शेतकरी!तालुका कोरडवाहू बागायतीअकोला ६२७२७ ३००३बार्शीटाकळी ३५५५३ ५०९३तेल्हारा १४७०५ १२७८५बाळापूर २०३०८ १९२०मूर्तिजापूर ३८६८०....................................................एकूण १७१९७३ २२८०१उपाययोजना जाहीर; आता मदतीकडे लक्ष!दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारणाच्या विविध उपाययोजना शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आल्या; मात्र दुष्काळबाधित शेतकºयांना पीक नुकसान भरपाईपोटी हेक्टरी आर्थिक मदतीची घोषणा अद्याप शासनामार्फत करण्यात आली नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मदत शासनाकडून केव्हा जाहीर होणार, याकडे आता दुष्काळग्रस्त शेतकºयांचे लक्ष लागले आहे.