संतोष येलकर/अकोला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणार्या कामांवरील जॉबकार्डधारक मजुरांची मजुरी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावी आणि मजुरी वाटपातील गैरप्रकारांना आळा घालता यावा, यासाठी मजुरांच्या बँक खाते क्रमांकाशी आधारकार्ड क्रमांक जोडला जात आहे. त्यानुसार अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ५ लाख ९७ हजार ३८२ मजुरांपैकी १ लाख ९१ हजार १३६ मजुरांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी जोडण्यात आले आहेत.रोहयो कामांवरील मजुरांच्या मजुरीबाबत अनेक तक्रारी असतात. या पृष्ठभूमीवर मजुरीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना राबविण्यात आली. मजुरी बँक खात्यात जमा होत असल्याने, मजुरीच्या रक्कमेचा गैरफायदा घेता येणार नाही. तसेच मजुरी वाटपात होणारा विलंब आणि मजुरांच्या नावावर मजुरीच्या रक्कमेत गैरप्रकार होवू नये, यासाठी रोहयो मजुरांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्नित करुन, त्याव्दारे मजुरांना मजुरी वाटप करण्याचे आदेश केंद्र शासनामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात रोहयो अंतर्गत जॉबकार्डधारक मजुरांचे बँकखाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित करण्याची मोहिम राबविली जात आहे. त्यामध्ये १ डिसेंबरपर्यंत पाचही जिल्ह्यातील रोहयो कामांवर कार्यरत ५ लाख ९७ हजार ३८२ मजुरांपैकी १ लाख ९१ हजार १३६ मजुरांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकशी जोडण्यात आले आहेत.अमरावती विभागाचे विभागीय उपायुक्त एस.टी.टाकसाळे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांवरील मजुरांच्या नावावर मजुरीत भ्रष्टाचार होवू नये, मजुरांची मजुरी त्यांनाच मिळावी, यासाठी जॉबकार्डधारक रोहयो मजुरांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी जोडले जात आहेत.जिल्हानिहाय ह्यआधारह्णशी जोडलेले बँक खाते !जिल्हा कार्यरत मजूर आधारशी जोडलेले खातेअमरावती २१५६१७ ८११६४अकोला ७८३९२ २८६१५बुलडाणा ७३६९७ १९९३८वाशिम ७३0२२ २८४४६यवतमाळ १५६६५४ ३२९७३...............................एकूण ५९७३८२ १९११३६
दोन लाख मजुरांचे बँक खाते जोडले ‘आधार’शी !
By admin | Published: December 04, 2014 11:55 PM