अकोला : सर्वोपचार रुग्णालयात कोरोनाचे आणखी दोन संशयित दाखल झाले असून, यातील एका रुग्णाला आयसोलेशन कक्षात, तर दुसऱ्या रुग्णाला अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. सध्यस्थितीत संशयितांची संख्या सहावर पोहोचली असून, त्यांच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.आतापर्यंत विदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाचे लक्षणे आढळून आले होते. त्यामुळे अशा संशयित रुग्णांनाच आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले होते. परंतु, आता समुह संसर्गातूनही आजारी पडणाºया रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी तीन रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले होेते या रुग्णांना स्वाईन फ्लू सोबतच कोरोनाचीही लक्षणे आढळल्याने त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू करण्यात आले. सोमवारी देखील अशाच आणखी एका रुग्णाला अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. यासोबतच विदेशातून आलेल्या एकाला आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले. या दोन्ही नवीन रुग्णांचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहेत. या सहा जणांचेही वैद्यकीय नमुने अद्याप प्रलंबित आहे.
CoronaVirus : कोरोनाचे आणखी दोन संशयित दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 6:44 PM