अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, बुधवार, २४ फेब्रुवारी रोजी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३५९ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २३४, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये ४५ अशा एकूण २७९ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १४,६९७ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९८५ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७५१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील ४९, एमआयडीसी व मुर्तिजापूर येथील १४, डाबकी रोड येथील ११, जीएमसी येथील १०, केशव नगर व सुकली येथील प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड व कौलखेड येथील प्रत्येकी सहा, मोठी उमरी व पोपटखेड येथील प्रत्येकी पाच, देवळी, रामदासपेठ व गणेश नगर येथील प्रत्येकी चार, सोपीनाथनगर, दुर्गा चौक, गड्डम प्लॉट, सिंधी कॅम्प, रजपूतपुरा, महाकाली नगर, बाळापूर रोड, अंबुजा, व्हीएचबी कॉलनी व गायगाव येथील प्रत्येकी तीन, गोरेगाव खु., तेल्हारा, बलवंत कॉलनी, राऊतवाडी, शिवाजी नगर, उन्नती नगर, खोलेश्वर, गंगा नगर, खडकी व रिधोरा येथील प्रत्येकी दोन, पास्टूल, कान्हेरी सरप, शिवाजी प्लॉट, इनकम टॅक्स, कलेक्टर ऑफीस, कपीलवास्तू नगर, कलाल चाळ, बार्शीटाकळी, पुनोती ता.बार्शीटाकळी, कारला ता. तेल्हारा, शिवसेना वसाहत, गीता नगर, देशमुख फैल, हिवरखेड, खोलेश्वर, गौरी अपार्टमेन्ट, सहकार नगर, गौरव नगर, जैन चौक, किर्ती नगर, उद्यान नगर, कृषी नगर, बलोदे लेआऊट, गोडबोले प्लॉट, जूने शहर, गवलीपुरा, बाळापूर नाका, शास्त्री नगर, नयागाव, बिर्ला गेट, नांदखेड टाकळी, यात्रा रोड चौक, भातवाडी बु., चिचोली, म्हातोडी व गोरेगाव येथील प्रत्येकी एक अशा २३४ रुग्णांचा समावेश आहे.
वाशिंबा व माना येथील पुरुषांचा मृत्यू
बुधवारी अकोला तालुक्यातील वाशिंबा येथील ५८ वर्षीय पुरुष व मुर्तीजापूर तालुक्यातील माना येथील ७३ वर्षीय पुरुष अशा दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरमयान मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे १३ व २३ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
२६६३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४,६९७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,६७५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३५९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत २,६३६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.