अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून गुरुवार, ४ मार्च रोजी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३७६ एवढी झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २८२, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ५५ अशा एकूण ३३७ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या १७,७८३ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १३२४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०३२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर येथील ४०,पारस येथील १४, डाबकी रोड येथील १६, कौलखेड, बार्शीटाकळी व खडकी येथील प्रत्येकी ११, मोठी उमरी येथील १०, पातूर येथील नऊ, जीएमसी व ऊरळ खु. येथील प्रत्येकी आठ, जठारपेठ व खोलेश्वर येथील प्रत्येकी सहा, राम नगर, रामदासपेठ, व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी चार, खेडकर नगर, रजपूतपुर, आदर्श कॉलनी, रतनलाल प्लॉट, म्हैसांग, तापडीया नगर, मलकापूर, अकोट, सिंधी कॅम्प, बाळापूर व जूने आरटीओ येथील प्रत्येकी तीन, गर्ल्स हॉस्टेल, कळबेंश्वर, मनकर्णा, गजाननपेठ, अखातवाडा, खिनखिनी, कोठारी नगर, न्यु खेतान नगर, तेल्हारा, पोपटखेड, पातूर, म्हातोडी, वडगाव मेंडे, नायगाव, समता नगर, येदलापूर व जामठी बु. येथील प्रत्येकी दोन, एळवण, अकोट फैल,गजानन पेठ, शिवर, विठ्ठल नगर, दगडपूल, जीएमसी हॉस्टेल, सागर कॉलनी, समता नगर, कॉग्रेस नगर, तारफैल, माधव नगर, आदर्श कॉलनी, न्यु तापडीया नगर, खदान, जूने शहर, श्रध्दा नगर, दुर्गा चौक, देहगाव, आपातापा, कापसी, दहिखेड ता.अकोट, गायत्री नगर, नखेगाव ता.अकोट, भागवतवाडी, गोकूल कॉलनी, सहकार नगर, इसीएचएस हॉस्पीटल, रणपिसे नगर, गड्डम प्लॉट, रणपिसे नगर, दहिहांडा, अंदुरा, मांजरी, वाशिम बायपास, महाजनी प्लॉट, शिवनी, गोडबोले प्लॉट, हनुमान वस्ती, तुकाराम चौक, केशवनगर, रागीनी वर्कशॉप, टॉवर चौक, शिवाजी नगर, अयोध्या नगर,वानखडे नगर, सिसा बोंदरखेड, लहान उमरी, हमता प्लॉट, राजूरा घाटे, विद्या नगर, निता गेस्ट हाऊस व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
अकोला शहरातील दोघांचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या अंबिका नगर, खदान येथील ७६ वर्षीय पुरुष व तापडीया नगर, येथील७२ वर्षीय महिला अशा दोघा रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला. या दोघांनाही १ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
४,२४५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७,७८३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १३,१६२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३७६ जणांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत ४,२४५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.